Honeymoon Destinations: डिसेंबरमध्ये हनिमूनचा प्लॅन करताय? ५ ड्रीम डेस्टिनेशन्स समोर परदेशही वाटेल फिका

Surabhi Jayashree Jagdish

लग्नानंतरचा हनिमून

लग्नानंतर हनिमूनमध्ये कपल्सना एकमेकांसोबत निवांत वेळ घालवता येतो. रोजच्या लग्नाच्या धावपळीपासून दूर जाऊन दोघांनाही एकत्र फिरता आणि नवीन आठवणी तयार करता येतात. त्यामुळे हनिमूनचे ठिकाण निवडताना दोघांच्या आवडी लक्षात घेणं महत्त्वाचं ठरतं.

December Honeymoon Destinations | saam tv

हनिमून डेस्टिनेशन

हनिमूनसाठी ठिकाण ठरवताना तिथलं हवामान, प्रवासाचा वेळ आणि राहण्याचा खर्च आधी तपासणं महत्त्वाचं आहे. डिसेंबरमध्ये काही ठिकाणी थंडी आणि बर्फ असतो, तर काही ठिकाणी समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेता येतो.

Romantic Places in India | saam tv

गोवा

डिसेंबरमध्ये गोव्यात साधारणपणे कोरडे आणि फिरण्यासाठी अनुकूल हवामान असतं. कपल्स समुद्रकिनाऱ्यावर फिरणं, सूर्यास्त पाहणं आणि समुद्रकिनाऱ्याजवळ डिनरचा आनंद घेऊ शकतात. बीच, नाईटलाइफ आणि फिरण्याची आवड असलेल्या कपल्ससाठी गोवा एक पर्याय ठरू शकतो.

India Honeymoon Packages | saam tv

मनाली

बर्फाळ प्रदेश डोंगरांच्या वातावरणात हनिमून घालवायचा असेल तर मनालीचा विचार करता येतो. डिसेंबरमध्ये मनाली आणि आसपासच्या उंच भागात बर्फवृष्टी होऊ शकते त्यामुळे प्रवासापूर्वी हवामानाची माहिती तपासा.

Manali Honeymoon | saam tv

काश्मीर

काश्मीरमध्ये डिसेंबरच्या काळात थंडी जाणवते आणि काही भागांमध्ये बर्फाच्छादित दृश्यं पाहायला मिळतात. श्रीनगर, गुलमर्ग आणि पहलगाम ही हनिमूनसाठी पाहता येणारी प्रमुख ठिकाणं आहेत. शिकारा राइड, बर्फातील खेळ आणि सुंदर पर्वतीय दृश्यांचा आनंद कपल्स घेऊ शकतात.

Manali Honeymoon in December | saam tv

उदयपूर

हनिमूनमध्ये शांत वातावरणासोबत राजेशाही अनुभव हवा असेल तर उदयपूरचा पर्याय निवडता येतो. शहरातील तलाव, राजवाडे आणि बोट राइडमुळे कपल्सना वेगळा प्रवासाचा अनुभव मिळतो. डिसेंबर महिन्यात उदयपूरमध्ये शहर फिरणं आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्याची मजा वेगळी आहे.

Romantic Getaways in India | saam tv

अंदमान

समुद्रकिनारे आणि पाण्यातील अॅक्टिव्हिटीज आवडत असतील तर अंडमान हनिमूनसाठी विचारात घेता येतं. स्वच्छ निळं पाणी, सुंदर समुद्रकिनारे आणि शांत वातावरणात कपल्सना निवांत वेळ घालवता येतो.

Romantic Vacation in India | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

Heart attack | SAAM TV
येथे क्लिक करा