Surabhi Jayashree Jagdish
हिवाळ्याच्या दिवसात अकोल्यामधील हवामान आल्हाददायक, कोरडं आणि फिरण्यासाठी अगदी योग्य असतं. या काळात निसर्ग, धार्मिक स्थळं आणि शांत ठिकाणांना भेट दिल्यास मन आणि शरीर दोन्ही फ्रेश होतं.
गर्दी कमी असल्यामुळे कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो. अकोल्याच्या आसपास अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही हिवाळ्यात फिरायला जाऊ शकता.
हे प्राचीन शिवमंदिर शहरातील श्रद्धेचं प्रमुख केंद्र आहे. हिवाळ्यात सकाळी आणि संध्याकाळी याठिकाणी शांत वातावरण अनुभवता येतो. धार्मिक शांतीसोबत मनःशांती मिळवण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे.
अकोल्यापासून थोड्या अंतरावर असलेला ऐतिहासिक किल्ला आहे. हिवाळ्यात थंडीमुळे ट्रेकिंग आणि किल्ला फिरणं सोपं जातं. इतिहास, निसर्ग आणि थंड हवा यांचा सुंदर संगम अनुभवता येतो.
मोर्ना नदीच्या काठावर हिवाळ्यात वातावरण खूप शांत असतं. सकाळी किंवा संध्याकाळी फिरण्यासाठी हा भाग छान वाटतो. निसर्गप्रेमींना निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे.
इतिहासप्रेमींसाठी बाळापूर किल्ला आकर्षणाचं ठिकाण आहे. हिवाळ्यात ऊन सौम्य असल्याने किल्ला पाहणं सोयीचं होतं. फोटोग्राफी आणि इतिहास अभ्यासासाठी हे ठिकाण उपयुक्त आहे.
हिवाळ्यात संध्याकाळी बाजारात फिरणं खूप आनंददायी असतं. गरम चहा, भजी आणि स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेता येतो. संस्कृती अनुभवण्यासाठी हा वेळ योग्य आहे.
जर तुम्हाला हिल स्टेशनवर जायचं असेल तर इगतपुरी हे तिथून जवळ असलेलं हिल स्टेशन आहे. यासाठी तुम्हाला थोडा प्रवास करावा लागू शकतो.