ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी मोठा खर्च करायलाच हवा असं नाही. योग्य नियोजन केल्यास ५००० रुपयांच्या आतही तुम्ही छान ट्रिप प्लॅन करु शकता.
खाजगी कारपेक्षा लोकल ट्रेन, एसटी बस किंवा शेअरिंग ऑटो वाहनांचा वापर करावा. यामुळे प्रवासाचा खर्च खूप कमी होतो.
कमी रुपयांमध्ये तुम्ही बेस्ट वन डे ट्रिप प्लॅन करु शकता. ५०० ते १००० रुपयांमध्ये तुम्ही माळशेज घाट, कसारा घाट, कर्जत,भिवपुरी वॉटरफॉल आणि पवना लेक या ठिकीणांवर तुम्ही जावू शकता.
लोणावळा, माथेरान, अलिबाग आणि हरिहरेश्वर या ठिकाणांना तुम्ही जावून भेट देवू शकता. वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.
हॉटेलऐवजी होमस्टे, डॉर्मिटरी, बजेट लॉज निवडा. 800 ते 1,200 रुपयांमध्ये एका रात्रीची सोय सहज होते.
मोठ्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये न खाता जवळ असलेले स्थानिक हॉटेल्स, स्ट्रीट फूड किंवा घरून थोडं खाणं घेऊन जा. दिवसाला ३०० ते ४०० रुपयांमध्ये जेवण आरामात होत.
न्यू इयर सेलिब्रेशनसाठी महागडे पार्टी पास टाळा. त्याऐवजी बीचवर जाऊन सिट-डाऊन, कॅम्पफायर, म्युझिक आणि मित्रांसोबत गेम्स खेळा आणि न्यू इयर सेलिब्रेशनचा आनंद घ्या.
प्रवास १५००, राहणे १२००, जेवण १०००, जीथे जाऊ तेथील एंट्री ८०० रुपये ट्रिप नीट प्लॅन केल्यास ट्रिपचा पूर्ण खर्च ५००० रुपयांच्या आत नक्कीच होऊ शकतो.