ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नववर्षाची रात्र निसर्गाच्या सानिध्यात साजरी करायची असेल, तर पवना लेक कॅम्पिंग हा सर्वात सुंदर आणि शांत पर्याय आहे. शहराच्या गोंधळापासून दूर, तसेच जवळच्या लोकांसह न्यू ईअर सेलिब्रेशन करायचा असेल, तर पवना लेक हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
मुंबईहून पवना लेकला जाण्यास २.५ ते ३ तास लागतात. मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरून लोणावळा मार्गे रस्ता सोपा आणि सुंदर आहे. पुण्याहून हा प्रवास अंदाजे १.५ ते २ तासांचा आहे. दोन्हीकडून ट्रेनने लोणावळा स्टेशनला उतरता येते आणि तेथून कॅब, ऑटो किंवा शेअरिंग जीपने तुम्ही थेट कॅम्प साइटपर्यंत पोहोचू शकता.
पवना लेक परिसरात अनेक लेक-टच कॅम्पिंग साईट्स उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला आरामदायी टेंट्स, मऊ स्लीपिंग बॅग, ब्लँकेट आणि वॉशरूम सुविधा दिल्या जातात. काही कॅम्पमध्ये मोठ्या ग्रुपसाठी डोम टेंट्सही मिळतात.
पवना लेकवर न्यू ईअर ची रात्र रंगतदार करण्यासाठी खास सेलिब्रेशन करण्यात येते. रात्री कॅम्पफायर पेटवून लाईव्ह म्युझिक किंवा डिजे पार्टी होते. 12 वाजता बलून लाईट्स, स्काय लॅटेनने न्यू ईअरची सुरुवात केली जाते.
कॅम्पिंग पॅकेजमध्ये बहुतेक ठिकाणी वेलकम टी-स्नॅक्स, BBQ आणि रात्री हॉट सूप मिळते. तसेच लेकच्या काठावर BBQ बनवण्याची मज्जा काहि वेगळीच असते.
दिवसभर कॅम्पसाईटवर बोटिंग, कायाकिंग, रायफल शुटिंग, आणि आऊट डोर्अस गेम्सचा आनंद घेता येतो. रात्री कॅम्पफायरभोवती बसून म्युझिक सोबत, गप्पा मारत थंडीचा आनंद घेत बाहेर बसू शकता.
पवना लेकजवळ तुंग किल्ला आणि तिकोना किल्ला हे दोन अप्रतिम सनराईज ट्रेक स्पॉट्स आहेत. तसेच लोणावळ्यातील लायन पॉइंट, टायगर पॉइंट बघू शकता.
डिसेंबर ते जानेवारी हा पवना लेक कॅम्पिंगला भेट देण्याचा बेस्ट टाईम आहे. या टाईममध्ये थंडी जास्त असल्यामुळे थंडीचा आनंद घेता येतो .