Manasvi Choudhary
लहानांपासून मोठ्यापर्यत सर्वांनाच पिझ्झा खायला आवडतो
मात्र घरी अनेकांना पिझ्झा बनवायला अवघड वाटते.
घरी पिझ्झा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
पिझ्झा बनवण्यासाठी टोमॅटो, टोमॅटो सॉस,शेजवान सॉस, पिझ्झा सॉस, ओरेगनो, मिरी पावडर, मिक्स हर्ब्ज, मीठ, बटर, शिमला मिरची, कांदा, बेबी कॉर्न, पनीर, चीझ, पिझ्झा बेस हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम शिमला मिरची आणि कांदा बारीक चिरून घ्या.
पिझ्झा बेस घ्या त्यावर थोडे बटर लावून टोमॅटो सॉस लावा.
नंतर यावर पिझ्झा सॉस लावून शेजवान सॉस किंवा चटणी लावा. आता सर्व मिश्रण पिझ्झा बेसवर पसरवून घ्या.
संपूर्ण पिझ्झावर आता बारीक चिरलेली शिमला मिरची, कॉर्न आणि पनीर कांदा सर्व भाज्या घाला.
आता या संपूर्ण मिश्रणावर ओरेगनो, मिरी पावडर, मिक्स हब्ज पसरवा. चवीनुसार थोडा मीठ घाला.
गॅसवर तवा गरम झाला की, तयार पिझ्झा ठेवा आणि झाकण लावा.
पिझ्झा शिजत आला की त्यावर वरून चिज घाला.
चीझ मेल्ट झाले की गॅस बंद करा. आणि पिझ्झा डिश मध्ये घा. चाकूने किंवा पिझ्झा कटरने कट करून खायला घ्या.