Manasvi Choudhary
तुम्ही सोसायटीमध्ये अथवा चाळीमध्ये गल्लीमध्ये लाल रंगाने भरलेली पाण्याची बाटली ठेवलेली पाहली असेल.
मात्र घराच्या बाहेर काळ्या पिशव्या ठेवण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे.
तुम्हीही अनेकदा काळ्या पिशव्या लटकवलेल्या पहिल्या असतील.
मात्र घराबाहेर काळ्या पिशव्या लटकवण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.
घराच्या बाहेर काळी पिशवी लावल्यास वाईट नजर लागू शकत नाही, असे मानले जाते.
गावाकडे काळ्या पिशव्या लटकवल्या जातात यामागचं कारण म्हणजे पक्षी , जनावरे हे घराच्या आजूबाजूला येत नाही आणि घाण करत नाही.
घराबाहेर काळ्या पिशव्या लटकवल्याने तेथे कबूतर येत नाही असा समज आहे.
काळ्या पिशव्या घराबाहेर लावल्याने कबूतर घराभोवती येण्यापासून रोकता येते.
मात्र याबाबत कोणतीही योग्य माहिती उपलब्ध नाही ज्यामध्ये कबुतर काळी पिशवी पाहून घाबरतात.