Alisha Khedekar
पितृ पक्षाला शास्त्रात पूर्वजांचे स्मरण, कृतज्ञता आणि श्राद्धासाठी महत्त्वाचा काळ मानले जाते.
या काळात पितरांचे स्मरण करून श्रद्धेने तर्पण आणि श्राद्ध करण्याची परंपरा आहे.त्यामुळे भीती बाळगू नका.
पितृ पक्षात गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा आवश्यक वस्तूंचे दान करण्याची परंपरा आहे.
अनेक कुटुंबांमध्ये या काळात साधा, सात्त्विक आहार घेण्याची आणि काही पदार्थ टाळण्याची प्रथा आहे.
विवाह किंवा मोठी शुभकार्ये या काळात टाळण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते.
सर्वपित्री अमावस्येला ज्ञात-अज्ञात सर्व पूर्वजांसाठी श्राद्ध करण्याला विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा