Shreya Maskar
पितृपक्षात श्राद्धाच्या जेवणात साधे, सात्त्विक आणि पचायला हलके पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. तेव्हा घरी अवघ्या १० -१५ मिनिटांत मुगाची खिचडी बनवा.
मुगाची खिचडी बनवण्यासाठी तांदूळ, मूग डाळ, तूप, जिरे, हिंग, हळद, मीठ आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
मुगाची खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ आणि मूग डाळ स्वच्छ धवून कुकरमध्ये घालून उकडून घ्या. २-३ शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली शिजते.
खिचडी शिजवताना त्यात ३ ते ४ कप पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. मुगाची खिचडी बनवण्यासाठी १५ - २० मिनिटे लागतात.
आता एका पॅनमध्ये तेल टाकून घ्या. तेल गरम झाले की त्यात जिरे, हिंग, हळद आणि मीठ टाकून फोडणी एकजीव करून घ्या.
फोडणी तडतडू लागल्यावर त्यात शिजवलेले तांदूळ आणि मूग डाळ टाका. खिचडी घट्ट वाटल्यास थोडे गरम पाणी घालून एक-दोन मिनिटे शिजवा.
शेवटी पानात / ताटात खिचडी वाढल्यावर वरून तुपाची धार सोडा. अशाप्रकारे पारंपरिक पद्धतीने खमंग मुगाची खिचडी तयार झाली.
पितृपक्षासाठी बनवत असल्यास कांदा, लसूण आणि गरम मसाले टाकावे की नाही ते पहावे. खिचडी मऊ आणि एकजीव होण्यासाठी तांदूळ व डाळ समान प्रमाणात घ्या.