Shreya Maskar
पितृपक्षातील जेवणासाठी साधी, सात्त्विक आणि चविष्ट भोपळ्याची भाजी बनवता येते. लाल भोपळ्याची नैसर्गिक गोड चव आणि गुळाचा हलका गोडवा यामुळे ही भाजी पुरी, पोळी किंवा वरण-भातासोबत छान लागते. कांदा-लसूण न वापरता ही रेसिपी करता येते.
लाल भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी लाल भोपळा, तेल, मोहरी, जिरे , हिंग, हळद, हिरवी मिरची, धणे-जिरे पूड, गूळ , किसलेले खोबरे, मीठ, कोथिंबीर , हिंग, हळद, हिरवी मिरची, धणे-जिरे पूड, गूळ, किसलेले खोबरे, मीठ, कोथिंबीर आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
लाल भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम लाल भोपळ्याची साल आणि आतील बिया काढून घ्या. भोपळ्याचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करा.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे घाला. ते तडतडल्यावर हिंग आणि चिरलेली हिरवी मिरची घाला.
हळद आणि धणे-जिरे पूड घालून लगेच भोपळ्याचे तुकडे कढईत टाका. मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा.
कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर भोपळा शिजवा. गरज वाटल्यास थोडे पाणी शिंपडा. भोपळा मऊ होईपर्यंत साधारण 8-12 मिनिटे शिजवा.
भोपळा मऊ झाल्यावर त्यात गूळ आणि किसलेले खोबरे घाला. हलक्या हाताने मिसळून आणखी 2-3 मिनिटे शिजवा. गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
भोपळा आधीच गोड असल्याने गूळ कमी प्रमाणात घाला. पितृपक्षासाठी स्वयंपाक करताना आपल्या घरच्या परंपरेनुसार कोणते मसाले किंवा पदार्थ वापरायचे/टाळायचे हे ठरवा. ही भाजी गरमागरम पुरीसोबत वाढल्यास पितृपक्षाच्या पारंपरिक जेवणात छान लागते.