Manasvi Choudhary
आज ८ सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरूवात झाली आहे.
पितृपक्षात तृप्तीसाठी आणि शांतीसाठी पिंडदान, श्राद्ध केले जाते.
पितृपक्षात कावळ्याला जेवण खायला दिले जाते.
पौराणिक कथेनुसार, ज्ञानेश्वरीत माऊलींनी 'पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे' असं म्हटलं आहे.
कावळ्याची काव काव शकुन आहे असे ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे.
कावळ्याटी चपळता, सुक्ष्म दृष्टी आणि सावधपणा लक्षात घेऊन यमराजांनी त्याला आपले दूत बनवले होते.
म्हणून पितृपक्षात कावळ्याला जेवू घातले जाते. असे मानले जाते कावळ्याने खाल्लेले अन्न यमराजपर्यंत पोहोचते आणि पितरांना पोहोचते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.