Pitru Paksha : पितृपक्षात घरात 'हे' ५ शुभ संकेत दिसले तर समजा पितरांचा आशीर्वाद मिळाला

Shreya Maskar

पितृपक्ष

सध्या पितृपक्षाचा काळ सुरू आहे. पितृपक्ष हा हिंदू परंपरेनुसार पूर्वजांचे स्मरण आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ मानला जातो. या काळात श्राद्ध विधी, तर्पण, पिंडदान केले जाते.

Pitru Paksha | pinterest

घरातील आनंद

धार्मिक श्रद्धेनुसार, जर घरात सतत शुभ घटना घडत असतील आणि पूर्वीचे वाद मिटले असतील, तर हे तुमचे पूर्वज प्रसन्न असल्याचे लक्षण आहे.

Happiness at home | pinterest

मुलाचा जन्म

पितृपक्षात तुमच्या घरी मुलाचा जन्म झाल्यास, असे मानले जाते की पूर्वजांनी पुनर्जन्म घेऊन तुमच्या घरी परत आले आहेत.

Birth of a child | pinterest

प्राण्यांचे अन्न खाणे

जर गाय, कुत्रा, मांजर यांसारखा एखादा प्राणी तुम्ही दिलेले अन्न प्रेमाने स्वीकारून निघून गेला, तर हे देखील पूर्वजांच्या आनंदाचे लक्षण मानले जाते.

Eating animal food | pinterest

कावळा येणे

घराच्या अंगणात किंवा गॅलरीत कावळा येणे शुभ मानले जाते. हिंदू परंपरेत कावळ्याला पितरांशी जोडले जाते आणि त्याला अन्न देण्याची प्रथा आहे.

crowing | pinterest

घरातील वातावरण प्रसन्न वाटणे

धार्मिक श्रद्धेनुसार पितृपक्षात शांत आणि सकारात्मक वातावरणाला शुभ संकेत मानले जाऊ शकते. तुमच्या पूर्वजांची कुटुंबावर , घरावर कृपा असल्याचे बोले जाते.

Feeling happy at home | pinterest

अचानक पूर्वजांची आठवण येणे

पितृपक्षात पूर्वजांची आठवण येणे हे स्वाभाविक आहे. धार्मिक दृष्टिकोनातून काहीजण याला पितरांचे स्मरण किंवा आशीर्वाद मानतात. तसेच स्वप्नात देखील पूर्वज दिसणे शुभ मानले जाते.

Sudden recollection of ancestors | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Pitru Paksha | pinterest

NEXT : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

Pitru Paksha | AI PHOTO
येथे क्लिक करा...