Shreya Maskar
सध्या पितृपक्ष सुरु आहे. तुम्हीही पितृपक्षात कांदा आणि लसूण न घालता भाजी बनवत असाल तर रस्सा बटाटा भाजी हा बेस्ट ऑप्शन आहे.
बटाट्याचा रस्सा बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, जिरे, हिंग, हळद, धणेपूड, लाल मिरचीपूड, गरम मसाला, आमचूर पूड , मीठ, तेल, कोथिंबीर आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
बटाट्याचा रस्सा बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकडून थंड करून घ्या. नंतर, त्यांची साल काढून मोठे तुकडे करा. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून जिरे, हिंग, हिरव्या मिरच्या यांची फोडणी द्या.
पुढे चिरलेले टोमॅटो घालून मंद ते मध्यम आचेवर शिजवा. टोमॅटो भांड्याच्या तळाला चिकटू नयेत आणि ते पूर्णपणे विरघळावेत यासाठी अधूनमधून ढवळत राहा.
टोमॅटो लवकर विरघळवण्यासाठी थोडे मीठ घालून भांड्यावर सुमारे १-२ मिनिटे झाकण ठेवा. त्यानंतर हळद, धणेपूड आणि लाल तिखट घालून सर्व मसाले चांगले मिसळा.
टोमॅटो आणि मसाले चांगले परतले जातील आणि भांड्यात तेल वेगळे होऊ लागेल, तेव्हा उकडलेले आणि जाडसर चिरलेले बटाटे घाला.
बटाट्याचे तुकडे मसाल्यांमध्ये चांगले मिसळा, जेणेकरून प्रत्येक तुकड्याला मसाला व्यवस्थित लागेल. आता बटाटे मंद आचेवर २-३ मिनिटे परतून घ्या.
मिश्रणात सुमारे एक ते दीड कप पाणी घाला. पातेल्यावर झाकण ठेवा आणि मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजू द्या, जेणेकरून बटाटे मसाल्यांचा स्वाद शोषून घेतील.
NEXT : बाजारातलं महागडं मध खरेदी करणं सोडा, घरच्या घरी फक्त ३ पदार्थांपासून 'असे' बनवा शुद्ध मध!