Homemade Honey Recipe : बाजारातलं महागडं मध खरेदी करणं सोडा, घरच्या घरी फक्त ३ पदार्थांपासून 'असे' बनवा शुद्ध मध!

Shreya Maskar

बाजारात मिळणारे मध

बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक मधात साखरेचा पाक, सिरप आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जची भेसळ केलेली असते, जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

Store-bought Honey | pinterest

घरगुती मध

स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या फक्त तीन घटकांचा वापर करून तुम्हाला सुगंधी, चवदार मध बनवता येते.

Homemade Honey | pinterest

मध

घरी मध तयार करण्यासाठी सफरचंदाचा रस, साखर, लिंबाचा रस, लवंगा आणि इतर काही साहित्यांची आवश्यकता असते.

Honey | pinterest

सफरचंद

मध बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये १ कप सफरचंदाचा रस आणि १ कप साखर घाला. मध्यम आचेवर ठेवा आणि साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत राहा.

Apple | pinterest

लिंबाचा रस

साखर पूर्णपणे विरघळल्यावर, १ मोठा चमचा लिंबाचा रस घाला. लिंबाच्या रसामुळे साखरेचे खडे तयार होत नाहीत आणि मध वर्षानुवर्षे घट्ट व चमकदार राहतो.

Lemon Juice | pinterest

मंद आचेवर शिजू द्या

आच कमी करा आणि मिश्रण १०-१२ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. जर तुम्हाला अधिक अस्सल मधासारखा सुगंध हवा असेल, तर शिजवताना २ लवंगा घाला आणि नंतर काढून टाका.

Simmer on Low Heat | pinterest

मधाचा घट्टपणा

जेव्हा मिश्रणाचा रंग हलका सोनेरी तपकिरी होईल आणि ते दाट पाकासारखे घट्ट होईल, तेव्हा गॅस बंद करा. थंड झाल्यावर मध अधिक घट्ट होते.

Honey's Consistency | pinterest

मध स्टोअर करा

तयार मध काचेच्या बाटलीत भरून साठवून ठेवा. तुम्ही तो रेफ्रिजरेटरशिवाय अनेक महिने वापरू शकता.

Store the honey | pinterest

NEXT : पनीर बनवल्यावर उरलेलं पाणी फेकता? थांबा, १० मिनिटांत बनवा हेल्दी गरमागरम सूप

Paneer Water Soup Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...