Pitru Paksha : तुपाचा खमंग स्वाद अन् गुळाची गोडी; पितृपक्षात बनवा गव्हाची लापशी, प्रसादासाठी एकदम सोपी रेसिपी

Shreya Maskar

पितृपक्ष

पितृपक्षात श्रद्धाच्या जेवणात, नैवेद्यात, प्रसादात गव्हाची गोड लापशी हा साधा, पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ बनवला जातो. गूळ आणि तुपाचा सुगंध लापशीची चव आणखी खुलवतो.

Pitru Paksha | pinterest

गव्हाची गोड लापशी

गव्हाची गोड लापशी बनवण्यासाठी गव्हाचा रवा/दलिया, गूळ, तूप, पाणी, दूध, वेलची पूड आणि सुकामेवा इत्यादी साहित्य लागते.

Gavhachi Lapsi recipe | pinterest

गहू

गव्हाची गोड लापशी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये २ टेबलस्पून तूप गरम करून त्यात गव्हाचा रवा खरपूस भाजून घ्या. गॅस कमी आचेवर ठेवा.

wheat | pinterest

रवा

मंद आचेवर रवा छान सोनेरी रंगाचा आणि सुगंधी होईपर्यंत भाजा. दुसऱ्या भांड्यात पाणी गरम करा आणि ते भाजलेल्या रव्यात हळूहळू घाला. गुठळ्या होऊ नयेत म्हणून सतत ढवळत राहा.

semolina | pinterest

गूळ

झाकण ठेवून लापशी ५-७ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. रवा मऊ झाल्यावर त्यात गूळ घाला आणि व्यवस्थित मिसळा.

jaggery | pinterest

वेलची पूड

गूळ विरघळल्यानंतर उरलेले तूप आणि वेलची पूड घाला. लापशी खूप घट्ट वाटत असल्यास थोडे गरम पाणी किंवा दूध घालून एक-दोन मिनिटे शिजवा.

Cardamom powder | pinterest

सुकामेवा

शेवटी आवडीनुसार सुकामेवा घालून गॅस बंद करा. अशाप्रकारे फक्त १० मिनिटांत गव्हाची लापशी तयार झाली आहे.

dried fruit | pinterest

टीप

गव्हाचा रवा मंद आचेवर व्यवस्थित भाजा, त्यामुळे लापशीला छान सुगंध येतो. गूळ घातल्यानंतर लापशी जास्त वेळ उकळू नका.

Gavhachi Lapsi recipe | pinterest

NEXT : पितरांसाठी बनवा खीर-पुरीचा नैवेद्य, स्वादिष्ट प्रसादाची सोपी रेसिपी

Pitru Paksha | AI PHOTO
येथे क्लिक करा...