Alisha Khedekar
हिंदू धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष हा पूर्वजांचे स्मरण श्रद्धांजली अर्पण करण्याचा काळ मानला जातो.
या काळात नवीन कपडे खरेदी करणे काही परंपरांमध्ये टाळले जाते. साधेपणा आणि पूर्वजांच्या स्मरणाला महत्त्व दिले जाते.
पितृपक्षात सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जात नाही, अशी काही धार्मिक मान्यता प्रचलित आहे.
नवीन वाहन, घर किंवा जमीन खरेदीची सुरुवात पितृपक्षानंतर करावी, अशी काही कुटुंबांत पारंपरिक पद्धत आहे.
धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षात झाडू खरेदी करणे टाळतात. घरातील लक्ष्मी आणि सकारात्मकतेशी त्याचा संबंध जोडला जातो.
काही परंपरांमध्ये या काळात मोहरीचे तेल खरेदी करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. हा प्रामुख्याने धार्मिक समजुतींचा भाग आहे.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा