Sakshi Sunil Jadhav
पितृपक्षाला ७ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. याचा शेवट २१ सप्टेंबरला होणार आहे. यामध्ये पितरांच्या नावाने दररोज तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध केले जाते.
पितृपक्षामध्ये श्राद्धासाठी जेवण केले जाते. हे जेवण कोणीही खाण्याआधी कावळ्यांना दाखवले जाते.
जोवर कावळा ते अन्न शिवत नाही. तोवर कोणीही अन्नाला हात लावत नाही.
कावळे हे नेमके त्याचवेळेस येत नसतील तर तुम्ही पुढील उपाय करु शकता.
पुढील उपाय केल्याने नक्कीच पुर्वज तुमचे अन्न किंवा श्राद्ध स्वीकारतील.
जर कावळा श्राद्धावेळी आला नाही तर पुर्वज उपाशीच गेले असे म्हंटले जाते. कारण कावळा हा यमाचे प्रतीक मानला जातो.
तुम्ही अशावेळेस गायी किंवा कुत्र्याला किंवा मुंग्यांना श्राद्ध देऊ शकता. यालाच पंचबली श्राद्ध म्हणतात.