Pithla Bhakri Recipe: थंडीत गरमागरम जेवणासाठी झटपट बनवा झणझणीत पिठलं-भाकरी, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

पिठल्यासाठी: १ कप बेसन, २ कप पाणी, १ कांदा बारीक चिरलेला, २ हिरव्या मिरच्या, ४ ते ५ लसूण पाकळ्या, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, २ चमचे तेल, मीठ चवीनुसार, कोथिंबीर. भाकरीसाठी: २ कप ज्वारीचे पीठ कोमट पाणी आवश्यकतेनुसार मीठ चवीनुसार

Gavran Pithla Bhakri recipe

बेसनाचे मिश्रण तयार करा

एका भांड्यात बेसन घ्या. त्यात थोडे थोडे पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने चांगले मिसळा. त्यात मीठ आणि हळद घालून मिश्रण तयार ठेवा.

Gavran Pithla Bhakri recipe

फोडणी तयार करा

कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंग घाला. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या आणि ठेचलेला लसूण घालून चांगले परतून घ्या.

Gavran Pithla Bhakri recipe

पिठलं शिजवून घ्या

कांदा मऊ झाल्यानंतर त्यात लाल तिखट घाला. आता तयार केलेले बेसनाचे मिश्रण कढईत ओता. सतत ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.

Pithla Bhakri Recipe

पिठल्याला छान उकळी येऊ द्या

मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. गरजेनुसार थोडे पाणी घाला. पिठल्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

Pithla Bhakri Recipe

भाकरीचे पीठ मळून घ्या

एका परातीत ज्वारीचे पीठ घ्या. त्यात चवीनुसार मीठ घालून थोडे थोडे कोमट पाणी टाकत मऊ पीठ मळून घ्या. पीठ खूप घट्ट किंवा पातळ ठेवू नका.

Pithla Bhakri | Saam tv

भाकरी थापून भाजून घ्या

पिठाचा गोळा घेऊन हाताने किंवा पाण्याच्या मदतीने भाकरी थापा. गरम तव्यावर भाकरी टाकून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या. हवे असल्यास थेट आचेवरही भाजू शकता.

gavran pithla recipe

गरमागरम पिठलं-भाकरी सर्व्ह करा

तयार पिठलं आणि ज्वारीची भाकरी ताटात वाढा. सोबत हिरव्या मिरचीचा ठेचा, कच्चा कांदा आणि लोणचे द्या. तयार आहे अस्सल महाराष्ट्रीयन झणझणीत पिठलं-भाकरी!

Pithla Bhakri

Tea or Coffee After Meals: जेवल्यानंतर चहा पिणे योग्य की कॉफी? जाणून घ्या पचनावर काय होतो परिणाम

Tea or Coffee After Meals | Saam Tv
येथे क्लिक करा