Shruti Vilas Kadam
पिस्त्यात फायबर आणि प्रथिने भरपूर असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
पिस्त्यातील व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देतात. त्यामुळे त्वचा निरोगी, मऊ आणि चमकदार दिसण्यास मदत होते.
बायोटिन, प्रथिने आणि हेल्दी फॅट्समुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. त्यामुळे केस गळणे कमी होऊन केस मजबूत आणि चमकदार राहतात.
प्रेग्नन्सीदरम्यान पिस्त्यातील फोलेट, प्रथिने आणि इतर पोषक घटक आई व बाळाच्या निरोगी विकासासाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र, आहारात समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पिस्त्यातील हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास हातभार लागू शकतो.
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे खनिज घटक हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त असतात. महिलांनी नियमित प्रमाणात पिस्ते खाणे फायदेशीर ठरू शकते.
दररोज साधारण २५ ते ३० ग्रॅम (एक मूठभर) पिस्ते खाणे पुरेसे मानले जाते. जास्त प्रमाणात सेवन केल्यास अतिरिक्त कॅलरी मिळू शकतात, त्यामुळे संतुलित प्रमाणातच खावेत.