Bharat Jadhav
हा रंग आता फक्त महिलांपुरता मर्यादित नाहीये, कारण पुरुषही आत्मविश्वासाने गुलाबी रंग स्वीकारत आहेत.
आज गुलाबी रंग हा स्त्रीत्वाचे प्रतीक मानला जातो, पण तुम्हाला माहितीये एके काळी हा रंग पुरुषांची ओळख असायचा?
पुरूषांची ओळख असलेला ही गुलाबी रंग महिलांची ओळख कसा झाला ते जाणून घेऊ.
18 व्या शतकात पाश्चात्य समाजात गुलाबी रंग शक्ती, ऊर्जा आणि धैर्याचे प्रतीक समजला जात होता.
निळा रंग सौम्य आणि शांतीचे प्रतीक मानला जात होता म्हणून हा रंग महिलांसाठी ओळखला जात होता.
20 व्या शतकात फॅशन आणि मार्केटिंगमध्ये रंगाची तुलना लिंगासोबत होऊ लागलीय.
अमेरिकन कंपन्यांनी गुलाबी रंग मुलींचा आणि निळा रंग मुलांचा अशी संकल्पना सुरू केली. त्यानुसार उत्पादनांचा प्रचार केला.
नंतर ही कल्पना समाजात खोलवर रूजत गेली. आता गुलांबी रंग महिलांची ओळख झालीय.
पुरुषांपासून महिलांपर्यंतचा गुलाबी रंगाचा प्रवास एका सांस्कृतिक बदलाचे प्रतिक मानला जातं.