Shreya Maskar
अननस शिरा बनवण्यासाठी रवा, अननस, तूप, ड्रायफ्रूट्स, साखर, केशर, दूध आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
अननस शिरा बनवण्यासाठी पॅनमध्ये तूप गरम करून रवा गोल्डन फ्राय करा.
पुन्हा पॅनमध्ये तूप टाकून अननसाचे बारीक काप परतून घ्या.
दुसरीकडे थोडे गरम पाणी करायला ठेवा आणि त्यात साखर विरघळवून घ्या.
साखरेच्या पाकात परतलेला रवा आणि अननस घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
त्यानंतर यात तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचे काप टाका.
शिऱ्याला चांगला रंग येण्यासाठी त्यात केशर मिक्स करा.
शेवटी थोडे दूध टाकून अननस शिरा शिजवून घ्या.