Best Foods To Eat And Avoid For Piles: मुळव्याध असेल तर काय खावे आणि काय टाळावे? जाणून घ्या

Manasvi Choudhary

मुळव्याध

मुळव्याध हा एक अत्यंत त्रासदायक आजार आहे. चुकीची जीवनशैली, अपूर्ण झोप आणि बद्धकोष्ठता ही या आजाराची मुख्य कारणे आहेत.

piles

मुळव्याध असेल तर आहारात करा बदल

मुळव्याध असेल तर तुम्ही आहारात काही पदार्थ्याचे सेवन करणे टाळावे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Best Foods To Eat And Avoid For Piles | pinterest

मुळव्याध असताना काय खावे?

मुळव्याध असेल तर पालेभाज्या आणि फळे खा. पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर असते. तसेच पपई, पेरू, सफरचंद आणि केळी यांसारखी फळे खाल्ल्याने पोट सहज साफ होते आणि शौचास त्रास होत नाही.

Best Foods To Eat Piles | yandex

धान्ये आणि कडधान्ये खा

पांढऱ्या पिठाऐवजी ज्वारी, बाजरी, ओट्स आणि नाचणी यांचा आहारात समावेश करा. मूग, मटकी आणि हरभरा यासांरखी मोड आलेली कडधान्ये खा जी पचनासाठी हलकी असतात.

Grain | yandex

डाळींची खिचडी आणि सॅलड खा

मूगडाळ, तूरडाळा या डाळींपासून बनवलेली खिचडी खा जी पचायला हलकी आणि सोपी असते तसेच सॅलड देखील खा पोटाला आराम मिळतो.

Khichdi

ताक आणि दही

ताक व दही खाल्ल्याने पोटातील गुड बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.

Curd

मुळव्याध असताना काय खाणे टाळावे?

मैद्याचे पदार्थ आणि बिस्किटे खाणे टाळा. मैद्यामुळे आतड्यांमध्ये अन्न अडकून राहते आणि बद्धकोष्ठता वाढते.

biscuits | yandex

तळलेले व फास्ट फूड

वडापाव, समोसे, पॅटीस हे जंक फूड मुळव्याध असलेल्यांनी खाणे टाळावे.

Fast food | pinterest

अति तिखट आणि मसालेदार पदार्थ

जास्त तिखट पदार्थ्यामुळे पोटाची जळजळ होऊन शौचाच्या ठिकाणी वेदना वाढू शकतात.

Spicy food | yandex

चहा-कॉफीचे अतिसेवन

चहा आणि कॉफीमधील कॅफिनमुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते ज्यामुळे बद्धकोष्ठता बळावते.

tea | pinterest

NEXT: Black Rice Benefits: पांढरे तांदूळ सोडून लोक का खाताहेत काळा तांदूळ, फायदे वाचून थक्क व्हाल

Black Rice Benefits
येथे क्लिक करा...