Ruchika Jadhav
दिप्तीने फुलवंती चित्रपटात पेशविणबाई यांची भूमिका साकारली आहे.
हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
या चित्रपटात दिप्तीने मराठमोळा साज केला आहे. तिच्या साड्या आणि दागिन्यांची अनेक महिलांना भूरळ पयडली आहे.
दिप्तीने पेशविणबाईंच्या लूकसाठी खोपा हेअरस्टाइल निवडली आहे.
फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये “शास्त्रीबुवा आणि फुलवंती”च्या आरोप-प्रत्यारोपांच्या खेळात, विजेत्याचा शोध लावण्यासाठी ‘फुलवंती’ चित्रपट नक्की बघा, असं लिहिलं आहे.
दिप्ती सध्याची एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाची आता जोरदार चर्चा होतेय.
अभिनेत्रीने हे यश मिळवण्यासाठी फार कमी काळात मोठं यशाचं शिखर गाठलं आहे.