Phulka Recipe: अस्सल पारंपारिक फुलके कसे बनवायचे?

Siddhi Hande

फुलके

जेवताना अनेकजण भाजीसोबत चपाती किंवा भाकरी खातात. तुम्ही कधी फुलके खाल्लेत का?

Phulka Recipe | Google

शरीरासाठी उत्तम

फुलके हे पचायला खूप हलके असतात. याचसोबत फुलक्यांना तेल लावत नाही त्यामुळे शरीरासाठीही चांगले असतात.

Phulka Recipe | Google

४ पदार्थांपासून बनवा फुलके

फुलके बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. यासाठी फक्त ४ गोष्टी लागतात.

chapati | yandex

साहित्य

गव्हाचे पीठ, पाणी, मीठ, तेल किंवा तूप

Phulka Recipe | Google

गव्हाचे पीठ

सर्वात आधी तुम्हाला परातीत गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. त्यात मीठ टाका आणि मिक्स करा.

Phulka Recipe | Google

तेल

या पीठात थोडे तेल किंवा तूप टाका आणि पाणी टाकून छान मळून घ्या.

Phulka Recipe | Google

पीठ झाकून ठेवा

पीठ मळल्यानंतर ते १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. जेणेकरुन फुलके मऊ होतील.

Phulka Recipe | Google

पीठाचे गोळे

या पीठाचे लहान गोळे करुन घ्या. त्यावर सुकं पीठ लावा. यानंतर पातळ फुलके लाटून घ्या.

Phulka Recipe | Google

तव्यावर भाजून घ्या

तुम्ही फुलके तवा किंवा गॅसवर भाजू शकतात. सर्वात आधी तव्यावर दोन्ही बाजूने भाजून घ्या.

Phulka Recipe | Google

गॅसवर भाजून घ्या

यानंतर फुलका चिमट्याने धरुन दोन्ही बाजूने गॅसवर भाजून घ्या. हे फुलके छान फुगतील.

Phulka Recipe | yandex

भाजी

फुलके तुम्ही भाजी किंवा आमटीसोबत खाऊ शकतात.

Phulka Recipe | yandex

Next: बम बम भोले! महाशिवरात्रीला घरीच बनवा ५ मिनिटांत थंडगार केसर थंडाई

Kesar Thandai | yandex
येथे क्लिक करा