Manasvi Choudhary
स्टार प्रवाहवरील फुलाला सुंगध मातीचा या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर.
सोशल मीडियावर समृद्धी नेहमीच सक्रिय असते. नुकतेच समृद्धीने अतिशय हटके अंदाजात व्हिडीओ शेअर केली आहे.
पारंपारिक जांभळ्या साडीतील समृद्धीचे फोटो चाहत्यांना आवडले आहेत. ती खुपच सुंदर दिसत आहे.
कपाळी कुंकू, गळ्यात नेकलेस असा तिने साजश्रृंगार केला आहे. केस मोकळे ठेवून समृद्धीन फोटो क्लिक केले आहेत.
या फोटोतील समृद्धीच्या अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. तिचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
समृद्धीने अत्यंत कमी कालाधीत इंडस्ट्रीत स्वत:च अनोखं स्थान निर्माण केलं आहे. समृद्धी अभिनेत्रीसोबत उत्तम डान्सर आणि निवेदिकादेखील आहे.
इन्स्टाग्रामवर समृद्धीची मोठी फॅनफॉलोविंग आहे. तिच्या फोटोंना देखील चाहते लाईक्स आणि कमेंट्स करत असतात.