Shreya Maskar
रात्रीच्या जेवणाला खमंग फोडणीचं वरण बनवा.
फोडणीचं वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ, पाणी, हळद, मीठ, तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता पाने, सुक्या लाल मिरच्या, लाल तिखट आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
फोडणीचं वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घालून तडतडू द्या.
आता उकडलेली डाळ फोडणीत मिक्स करा.
डाळीत चवीनुसार मीठ आणि तिखट घाला.
डाळीत शेवटी कोथिंबीर टाकून छान मिक्स करा.
तुम्ही फोडणीचं वरण बनवताना त्यात कांदा, लसूण आणि टोमॅटो देखील टाकू शकता.