Manasvi Choudhary
आज सर्वत्र महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.
महाशिवरात्रीनिमित्त अनेकजण उपवासाचे व्रत करतात.
महाशिवरात्रीच्या उपवासाला फळाचे सेवन केले जाते. महाशिवरात्रीचा उपवास थंडाई पिऊन देखील सोडतात.
शंभू महादेवाला थंडाई अतिशय प्रिय आहे. यामुळे पेरूची थंडाई बनवायला अत्यंत सोपी आहे.
पेरूची थंडाई बनवण्यासाठी दूध, पेरू , काजू, बदाम, पिस्ता, काळी मिरी, वेलची पावडर, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर एका पॅनमध्ये गरम तेलामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता हलकासा परतून घ्या त्यानंतर ते सर्व एका प्लेटमध्ये काढा.
नंतर काजू, बदाम आणि पिस्ता मिक्सरला बारीक वाटून घ्या आता यामध्ये वेलची पावडर घाला.
थंडाई बनवण्यासाठी दूध घ्या यामध्ये पेरूचा रस मिसळा.
काजू, बदाम चे मिश्रण आता चांगल्या पद्धतीने मिसळून घ्या
अशाप्रकारे तुमची पेरू थंडाई तयार आहे. थंड हव असल्यास यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडे देखील घालू शकता.