Peru Chutney : घरच्या घरी ५ मिनिटांत बनवा पेरूची चटपटीत चटणी, जेवणाची वाढवेल चव

Alisha Khedekar

चटणीचे साहित्य

पेरूची आंबट-गोड चटणी तिखटपणामुळे अधिक चविष्ट लागते. दोन पेरू, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, मीठ, लिंबाचा रस आणि जिरे आवश्यक आहेत.

Peru Chutney Recipe | Google

पेरू स्वच्छ धुवा

पेरू स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि त्याला व्यवस्थित गॅसवर भाजून घ्या. त्याचे छोटे तुकडे करा, जेणेकरून चटणी वाटताना सोपे जाईल.

Peru Chutney Recipe | Google

चटणी वाटप

मिक्सरमध्ये पेरू, मिरच्या, लसूण, कोथिंबीर, मीठ आणि जिरे घालून मिश्रण जाडसर वाटून घ्या.

Peru Chutney Recipe | Google

आंबटपणासाठी लिंबू

वाटलेल्या चटणीत थोडा लिंबाचा रस मिसळा. यामुळे चटणीची आंबट-तिखट चव आणखी छान लागते.

Peru Chutney Recipe | Google

आवश्यकतेनुसार

चटणी चाखून पाहा. मीठ, तिखट किंवा लिंबाचा रस आवश्यकतेनुसार घाला आणि चव संतुलित करा.

Peru Chutney Recipe | Google

कशासोबत खावी?

ही चटपटीत पेरूची चटणी भाकरी, पोळी, पराठा, वडे किंवा भजीसोबत खायला अतिशय स्वादिष्ट लागते.

Peru Chutney Recipe | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Peru Chutney Recipe | Google

NEXT :  अंतर्वस्त्रे न घालता रात्री झोपणं खरंच फायदेशीर आहे का?

benefits of sleeping without undergarments | AI Image
येथे क्लिक करा