Personality Development Tips: ऑफिसमध्ये स्मार्ट आणि कॉन्फिडन्स दिसायचंय? मग या ७ चुका नेहमी टाळा

Shruti Vilas Kadam

खूप हसणे किंवा अजिबात न हसणे

अनोळखी व्यक्तींशी बोलताना सतत हसत राहणे किंवा पूर्णपणे गंभीर राहणे टाळा. चेहऱ्यावर शांत आणि नैसर्गिक भाव ठेवणे अधिक योग्य ठरते.

Personality Development Tips

स्वतःबद्दल सतत स्पष्टीकरण देणे

आपल्या प्रत्येक निर्णयाचे किंवा कृतीचे वारंवार स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. आपली बाजू स्पष्टपणे मांडा आणि त्यानंतर अनावश्यक सफाई देणे टाळा.

Personality Development Tips | Saam tv

देहबोलीकडे दुर्लक्ष करणे

समोरच्या व्यक्तीशी बोलताना सतत खाली पाहणे किंवा अस्वस्थपणे हालचाल करणे आत्मविश्वासाची कमतरता दर्शवू शकते. त्यामुळे पोश्चर सरळ आणि नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा.

Personality Development Tips

ठिकाणानुसार कपडे घालणे

प्रत्येक प्रसंगासाठी जीन्स किंवा टी-शर्ट योग्य असेलच असे नाही. कुठे, कोणाला आणि कोणत्या कारणासाठी भेटणार आहात, यानुसार कपड्यांची निवड करणे महत्त्वाचे आहे.

Personality Development Tips

प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणे

इतरांच्या प्रत्येक बोलण्यावर कमेंट करणे, टीका करणे किंवा लगेच प्रतिक्रिया देणे टाळा. लोकांमध्ये असताना विचार करून बोलणे, शांत राहणे आणि समोरच्याचे ऐकणे हे आत्मविश्वासाचे लक्षण मानले जाते.

Personality Development Tips

बोलणे आणि कृती यात फरक ठेवणे

तुम्ही जे बोलता, त्याप्रमाणेच तुमच्या कृतीतूनही ते दिसायला हवे. बोलणे आणि वागणे यात सातत्य असेल तर लोक तुमच्याकडे अधिक गांभीर्याने पाहतात आणि तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो.

Personality Development Tips

Hair Cut: सुंदर आणि स्टायलिश दिसायचंय? मग, फेस शेपनुसार मुलींनी निवडावा 'हे' हेअरकट

Hair Cut
येथे क्लिक करा