Hair Cut: सुंदर आणि स्टायलिश दिसायचंय? मग, फेस शेपनुसार मुलींनी निवडावा 'हे' हेअरकट

Shruti Vilas Kadam

गोल चेहरा

गोल चेहऱ्यासाठी लेयर्ड हेअरकट, लाँग बॉब किंवा साइड पार्टिंग चांगले पर्याय ठरू शकतात. यामुळे चेहरा थोडा लांबट दिसण्यास मदत होते.

Hair Cut

ओव्हल चेहरा

ओव्हल फेस शेपवर अनेक प्रकारचे हेअरकट खुलून दिसतात. शॉर्ट बॉब, लेयर्स, लॉन्ग हेअर किंवा बॅंग्स यापैकी तुमच्या आवडीनुसार स्टाइल निवडू शकता.

Hair Cut

चौकोनी चेहरा

चौकोनी चेहऱ्याच्या जबड्याची रचना ठळक असते. त्यामुळे सॉफ्ट लेयर्स, वेव्ही हेअरकट किंवा साइड-स्वेप्ट बॅंग्स चेहऱ्याच्या फीचर्सला सॉफ्ट लूक देऊ शकतात.

Hair Cut

हार्ट शेप चेहरा

कपाळ रुंद आणि हनुवटी अरुंद असलेल्या चेहऱ्यासाठी चिन-लेंथ बॉब, साइड बॅंग्स किंवा लाँग लेयर्स सुंदर दिसू शकतात.

Hair Cut

डायमंड फेस शेप

गालांची हाडे उठावदार असतील तर मिड-लेंथ लेयर्स किंवा सॉफ्ट वेव्हज ट्राय करू शकता. हेअरकटमुळे चेहऱ्याच्या रचनेला संतुलित लूक मिळतो.

Hair Cut

लांबट चेहरा

लांब चेहऱ्यासाठी शोल्डर-लेंथ कट, कर्टन बॅंग्स किंवा फ्रिंज चांगले पर्याय ठरू शकतात. यामुळे चेहरा तुलनेने संतुलित दिसतो.

Hair Cut

आयताकृती चेहरा

आयताकृती चेहऱ्यासाठी लेयर्ड कट, साइड बॅंग्स आणि वेव्ही हेअरस्टाइल निवडू शकता. चेहऱ्याच्या लांबीपेक्षा केसांमध्ये व्हॉल्यूम वाढवणारे कट अधिक उठून दिसतात.

Hair Cut

Weight Loss Tips: खरचं वजन कमी करायचं आहे? मग आजपासूनच खाणं बंद करा 'हे' ७ पदार्थ

Weight Loss Tips | Saam Tv / AI
येथे क्लिक करा