Shruti Vilas Kadam
जास्त ताण (stress) हार्मोन्सवर परिणाम करतो. योग, ध्यान आणि पुरेशी झोप घेतल्याने पाळी नियमित होण्यास मदत होते.
अचानक वजन वाढणे किंवा घटणे यामुळे मासिक पाळी बिघडू शकते. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे.
पोटावर गरम पाण्याची बॉटल ठेवणे किंवा गरम पाण्याने अंघोळ केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि पाळी येण्यास मदत होऊ शकते.
हळदीचे दूध शरीरातील हार्मोनल बॅलन्स सुधारण्यास मदत करते. रोज रात्री एक ग्लास गरम हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरू शकते.
आले आणि गुळाचे सेवन केल्याने शरीर उष्ण राहते आणि पाळी सुरू होण्यास मदत मिळू शकते.
पपई आणि अननस हे उष्ण गुणधर्म असलेले फळ आहेत. त्यांचा नियमित आहारात समावेश केल्याने पिरियड्स सुरू होण्यास मदत होऊ शकते.
जर २-३ महिने सतत पाळी येत नसेल, तर मासिक पाळी अनियमितता किंवा हार्मोनल समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.