Alisha Khedekar
काही वेळा रक्त गर्भाशयात जास्त वेळ राहिल्याने गडद दिसते; हे आजाराचे लक्षण नाही.
पाळीच्या सुरुवातीला किंवा शेवटी जुनं रक्त बाहेर पडल्यामुळे तपकिरी रंग दिसू शकतो.
रक्तस्राव कमी असल्यास गुलाबी रंग दिसतो; मात्र वारंवार असे होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
खूप जास्त रक्तस्राव असल्यास हार्मोनल समस्या, फायब्रॉइड किंवा इतर कारणांची तपासणी आवश्यक असू शकते.
पाळीच्या शेवटी जुनं रक्त ऑक्सिडाइज झाल्यामुळे काळसर दिसू शकते; रंगावरून आजार ठरवता येत नाही.
वारंवार मोठ्या गुठळ्या आणि जास्त रक्तस्राव होत असल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे योग्य ठरते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा