Shruti Vilas Kadam
उन्हाळ्यात किमान SPF 30 ते SPF 50 असलेली सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. हे त्वचेला हानिकारक UV किरणांपासून संरक्षण देते.
UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून संरक्षण देणारी “Broad Spectrum” सनस्क्रीनच निवडा.
ऑयली स्किनसाठी जेल बेस्ड, ड्राय स्किनसाठी क्रीम बेस्ड आणि सेंसिटिव्ह स्किनसाठी हायपोअॅलर्जेनिक सनस्क्रीन निवडावी.
सनस्क्रीन घराबाहेर पडण्याच्या किमान 15-20 मिनिटे आधी लावल्यास ती त्वचेत चांगली शोषली जाते.
घाम, पाणी किंवा उन्हामुळे सनस्क्रीनचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे दर 2-3 तासांनी पुन्हा लावणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात घाम जास्त येतो, त्यामुळे water-resistant सनस्क्रीन अधिक प्रभावी ठरते.
फक्त चेहरा नाही, तर मान, हात, पाय आणि कान यांसारख्या उघड्या भागांवरही सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.