Shreya Maskar
अनेक लोकांना गोल चपाती बनवताना अडचण येते. काही केल्या आकार गोल येत नसेल तर काही खास टिप्स फॉलो करून पाहा.
गोल चपाती बनवण्यासाठी पीठ देखील योग्य पद्धतीने मळणे गरजेचे आहे. त्यामुळे चपातीचे पीठ मळताना नेहमी कोमट पाणी वापरा. यामुळे चपाती मऊ होते.
पीठ मळून झाल्यावर थोडे तेल लावून कणिक १०-१५ बाजूला ठेवून द्या. यामुळे कणिक चांगली मुरते आणि चपाती गोल होते.
गोल चपाती बनवण्यासाठी पोळपाटावर कोरडे पीठ पसरवून घ्या. तसेच थोडे पीठ हाताला देखील लावून घ्या. जेणेकरून कणिक चिकटणार नाही.
कणकेचा एक गोळा घ्या आणि दोन्ही हातांनी दाबा. हातावर २-३ वेळा गोल गोल फिरवून चपाती पोळपाटावर ठेवा आणि गोल लाटा.
आता लाटण्याला देखील कोरडे पीठ लावून घ्या. जेणेकरून चपाती पोळपाटावर पटापट गोल फिरेल आणि गोल आकार काढण्यासाठी अडचण येणार नाही.
पीठ जितके चांगले मळले गेले असेल तितकीच चपाती गोल आकारात लाटणे सोपे होईल. त्यामुळे चपातीचे कणिक मळताना तेल, पाणी यांचे योग्य प्रमाण घ्या.
गोल आकाराच्या चपात्या तुपात भाजून चटपटीत भाजीसोबत आस्वाद घ्या. अशाप्रकारे बनवलेल्या चपात्या मऊ होतात.