Shreya Maskar
अनेक वेळा जेवण बनवताना आपण घाईत असतो, तेव्हा चुकून पदार्थात मसाला जास्त पडला तर, जेवण फेकून न देता सोप्या ट्रिक वापरून तुम्ही तिखटपणा कमी करू शकता.
भाजीत मसाला जास्त पडला असेल तर अर्धा लिंबू पिळून त्यात घाला. जेणेकरून आंबटपणामुळे तिखटाचा झणका कमी होतो. तुम्ही भाजी आरामात खाऊ शकाल.
तिखट जेवणात तुम्ही साखर टाकू शकता. ज्यामुळे भाजीला थोडा गोडवा येतो आणि चव देखील समतोल राहते. भाजीची चव बिघडत नाही.
भाजी तिखट झाल्यावर यात साजूक तूप घाला आणि भाजी गरम करा. यामुळे तूप सर्व भाजीला चांगल्या पद्धतीने लागते.
भाजीतला मसाला कमी करण्यासाठी यात थोडी जास्तीची भाजी टाका. म्हणजे तिखटपणा कमी होईल. भाजी टाकल्यावर चांगली शिजवून घ्या.
भाजी जास्त तिखट झाली असेल तर दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. भाजीत दही चांगले फेटून टाक. तसेच तुम्ही यात फ्रेश क्रीम देखील टाकू शकता.
सुक्या भाज्यांमध्ये मसाला जास्त झाल्यास त्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. तो म्हणजे भाजीत भाजलेले बेसन टाका.
भाजीमध्ये कच्च्याबटाट्याचे तुकडे टाका. कारण बटाटा अतिरिक्त मीठ आणि मसाले शोषून घेतो.