Manasvi Choudhary
अवघ्या काही दिवसांमध्ये दिवाळी या सणाची धामधूम सुरू होणार आहे. दिवाळीमध्ये सर्वच महिला आणि तरुणी खास पारंपारिक मराठमोळा लूक करतात.
कोणतीही साडी असो वा सुंदर ड्रेस, त्यावर योग्य मेकअप केल्याशिवाय लूक पूर्ण होत नाही. मेकअपमध्ये जर ओठांवर योग्य रंगाची लिपस्टिक लावली, तर संपूर्ण लूक उठून दिसतो.
जर तुम्ही दिवाळीत बेज, गोल्डन किंवा आयव्हरी रंगाचा ड्रेस किंवा साडी नेसली असेल, तर त्यावर वाईन कलरची लिपस्टिक तुम्ही निवडू शकता.
पारंपारिक पैठणी किंवा लाल-गुलाबी रंगाच्या साड्यांवर क्लासिक रेड रंगाची लिपस्टिक तुम्ही निवडू शकता.
लाल आणि तपकिरी रंगाचे मिश्रण असणारी बेरी लिपस्टिक शेड वेस्टर्न तसेच इंडो-वेस्टर्न दोन्ही कपड्यांवर अतिशय सुंदर दिसते.
तुम्हाला जर खूप डार्क मेकअप नको असेल आणि सिम्पल पण एलिगंट लूक हवा असेल, तर रोझ पिंक लिपस्टिक शेड निवडा.
सध्या महिला व मुलींमध्ये ब्राऊन रंगाच्या विविध शेड्सची प्रचंड क्रेझ आहे. न्यूड मेकअप लुकसाठी निवडू शकता.
NEXT: 5 Best Drink To Control Blood Sugar: शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी 5 ड्रिंक सर्वात बेस्ट, कधी आणि कसे प्यावे?