Shreya Maskar
हिवाळ्यात गरमागरम गुळाचा चहा बनवा.
गुळाचा चहा बनवण्यासाठी दूध, पाणी, ओवा, आलं, वेलची, तुळशीची पाने, चहा पावडर आणि किसलेला गूळ इत्यादी साहित्य लागते.
गुळाचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा.
पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात किसलेला गूळ, आलं, वेलची पूड, तुळशीची पाने, चहा पावडर घालून उकळून घ्या.
उकळलेला चहा कपमध्ये गाळून त्यात गरम दूध मिक्स करा.
अशाप्रकारे गुळाचा फक्कड चहा तयार झाला.
चुकूनही चहात गूळ आणि दूध एकत्र घालू नका.
गुळाचा चहा बनवताना थंड दूध घालणे टाळा