Shreya Maskar
नारळाचे लाडू बनवण्यासाठी ओले खोबरे, तूप, दूध, खवा, सुकामेवा, साखर आणि केशर इत्यादी साहित्य लागते.
ओले खोबरे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये किसलेले खोबरे मंद आचेवर भाजून घ्या.
आता पॅनमध्ये तूप घालून त्यात मावा आणि साखर भाजून घ्या.
तुपात सुकामेवा देखील भाजून घ्या.
आता एका बाऊलमध्ये सुकामेवा, मावा, साखर, ओले खोबरे, दूध आणि केशर टाकून मिक्स करून घ्या.
आता या मिश्रणाचे छान लाडू वळून घ्या.
फ्रिजमध्ये ओल्या नारळाचे लाडू तीन ते चार दिवस फ्रेश राहतात.