Shruti Vilas Kadam
जर तुमचा चेहरा गोल स्वरूपाचा असेल, तर स्क्वेअर, रेक्टँग्युलर असलेले फ्रेम छान दिसतील. गोल फ्रेम टाळा, कारण त्याने चेहरा अधिक गोल दिसू शकतो.
जर तुमचा चेहरा स्क्वेअर असेल तर तुमच्या जबड्याची रेषा अधिक स्पष्ट असते. अशा लोकांवर गोल कडा असलेल्या फ्रेम्स चांगल्या दिसतात. म्हणजेच, तुम्ही अंडाकृती किंवा वर्तुळाच्या आकाराच्या फ्रेम्स घेऊ शकता.
ओव्हल चेहऱ्यांवर सगळ्या प्रकारचे फ्रेम सुट करतात. अशा लोकांना प्रत्येक आकाराच्या फ्रेम्स शोभतात.
हार्ट शेप चेहरा असलेल्यांचे कपाळ मोठे असते हनवटी छोटी अशा व्यक्तींनी सेमी-रिम फ्रेम्स किंवा एविएटर प्रकारचे फ्रेम वापरावेत.
तुमचा चेहरा लांब असेल तर, जाड आणि बोल्ड फ्रेम्स वापरावेत, जो चेहऱ्यावर आकर्षक दिसतो.
चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे फ्रेम जाडी आणि आकार निवडणे महत्त्वाचे आहे.
आजच्या काळात चष्मा फक्त नजरेसाठी नाही, तो एक स्टाइल स्टेटमेंट म्हणून देखील वापरला जातो. त्यामुळे तुमच्या चश्म्याची फ्रेम निवडताना ती तुमच्या चेहऱ्यानुसार साजेशी असावी.