ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयब्रो तुमच्या चेहऱ्याचा आकार बिघडवू किंवा सुधारू शकतात. जर तुमच्या आयब्रोंना परफेक्ट आकार दिला असेल, तर तुम्ही सुंदर दिसू शकतात.
महिला महिन्यातून किमान एकदा तरी थ्रेडिंग करण्यास जातात. थ्रेडिंग केल्यामुळे चेहऱ्याला योग्य लुक मिळतो आणि आयब्रोंनाही आकार येतो.
कधीकधी, आयब्रो बनवताना आपल्याकडून चुका होतात. यामुळे चेहऱ्याचा आकार तर खराब दिसतोच, पण आयब्रोचीही शोभा बिघडते.
जर तुम्हीही दर महिन्याला आयब्रो करून घेण्यासाठी पार्लरमध्ये जात असाल, तर या गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे तुमच्या आयब्रोंना योग्य आकार देण्यास मदत होईल.
तुमच्या आयब्रोचा आकार तुमच्या चेहऱ्यावर खूप मोठा फरक पाडतो. त्यामुळे, तुम्हाला पातळ की जाड आइब्रो हव्यात, हे ब्युटीशियनला आधीच सांगा.
आयब्रो करताना त्यांना ताणून धरावे लागते. आयब्रोंना हाताने घट्ट पकडून ठेवा, नाहितर आइब्रोचे केस वाकडे तिकडे कापले जाऊ शकतात.
तुम्ही टिकली लावत असाल किंवा नसाल, तरीही तुमच्या आयब्रोंमध्ये योग्य अंतर ठेवा. हे अंतर खूप जास्त किंवा खूप कमी ठेवल्यास तुमचा चेहरा विचित्र दिसू शकतो.
आयब्रोंची जेव्हा वाढ चांगली होईल तेव्हा आयब्रो करण्यास जावे. जर वाढ कमी असेल, आइब्रो चांगल्याप्रकारे सेट होत नाही.
थ्रेडिंगनंतर, मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. यामुळे आइब्रोच्या भागावर पुरळ येण्यापासून बचाव होईल.