कोमल दामुद्रे
मेथीच्या पानांप्रमाणेच त्याच्या बिया आरोग्यासाठी चांगले आहे.
यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक खनिजे असतात.
मेथी दाण्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यापासून ते पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत होते. तसेच त्वचा आणि केसांची वाढ सुधारण्यास मदत होते.
काही लोकांनी चुकूनही मेथी दाण्याते पाणी पिऊ नये. जाणून घेऊया त्याबद्दल
मेथी दाण्याचे पाणी शरीरातील रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. म्हणून ज्यांच्या रक्तात साखरचे प्रमाण कमी असेल त्यांनी याचे सेवन करु नये.
हार्मोनल असंतुलनच्या समस्येशी झुंज देत असाल तर मेथीचे पाणी पिणे टाळावे.
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी औषधे घेत असाल तर मेथी दाण्याचे पाणी पिऊ नका.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.