कोमल दामुद्रे
मार्च महिन्यात खरमास आल्यामुळे शुभ कार्यावर करण्यास मनाई होती. परंतु, एप्रिल महिन्यात लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत.
१४ मार्च पासून खरमास सुरु झाल्यानंतर विवाह करु नये असे ज्योतिष्यांनी सांगितले होते. हा खरमास १३ एप्रिलला संपणार आहे.
१३ एप्रिलला सूर्य मीन राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करणार आहे. या दिवसांपासून शुभ कार्यास सुरुवात होईल. लग्नाचे मुहूर्त कधी जाणून घेऊया.
१८ एप्रिल ही तारीख लग्नासाठी शुभ आहे. या दिवशी मघा नक्षत्र आहे.
१९ एप्रिलला एकादशी तिथी आहे. या दिवशी लग्न करणे शुभ ठरेल.
उत्तरा फाल्गुन नक्षत्रामुळे या दिवशी लग्न करणे शुभ मानले जाईल. यासोबतच तिथीही द्वादशी आहे. २० एप्रिलचा मुहूर्त चांगला आहे.
२१ एप्रिल हा दिवस लग्न मुहूर्तासाठी शेवटचा आहे.यानंतर एप्रिल महिन्यात लग्नसाठी शुभ मुहूर्त नाही.