Surabhi Jayashree Jagdish
छोट्या प्रवासाच्या दृष्टीने दिवस बोलका आहे. जवळच्या व्यक्तींबरोबर प्रवास होतील.
एखाद्या नाते जपण्यासाठी काही वेळेला आटापिटा करावा लागतो. आज कुटुंबीयांच्या कडून लाभ मिळण्याचा संभव आहे.
बोल घेवडेपणा ही आपल्या राशीची खासियत आहे. आज स्वतः पुढाकार घेऊन अनेक ठिकाणी कार्य कराल तब्येतही चांगली राहील.
अति साधेपण आणि भावनिक गुंतवणूक ही दरवेळी चांगली नसते. नको त्या ठिकाणी मन अडकणे त्रासदायक ठरेल.
सामाजिक क्षेत्रामध्ये आज आपली उठबस होईल. महत्त्वाच्या राजकारणी व्यक्तीबद्दल बरोबर किंवा सरकारी अधिकाऱ्यांवर महत्त्वाच्या मुलाखती होतील.
कर्माचे फळ हे प्रत्येक व्यक्तीला मिळते. आज आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्रगती रूपे भेटणार आहे.
लक्ष्मीची कृपा आणि वरदहस्त आज आपल्यावर विशेष राहणार आहे. अनेक दिवस पैशामुळे अडलेल्या गोष्टी आज करायला हरकत नाहीत.
गूढ शास्त्राविषयी विशेष कल वाढेल. अचानक मिळणाऱ्या पैशाच्या मागे आज धावून अडचणी वाढवून घेऊ नका.
"जुळून येती रेशीमगाठी" असा छानसा दिवस आहे. संसारातील आनंद फुलेल.एकमेकांच्या सहकार्याने नवीन स्वप्ने रंगवाल.
आपल्या राशीला पाचवीला पुजलेले कष्ट आणि कटकटी आहेतच. यालाच सर्वस्व मानावे लागेल. आज या गोष्टींचा नि:पात करून पुढे जावे लागेल.
अभ्यासामध्ये विशेष संशोधनात्मक गोष्ट होईल. आपली प्रज्ञा वृत्ती वाढेल. विद्यार्थ्यांना दिवस चांगला आहे. तरुणांना प्रेमात यश मिळेल.
जे ठरवले आहेत तशीच नियोजनबद्ध कामे आज पार पडतील. घरी पाहुण्यांची ऊठबस राहील. एखादे धार्मिक कार्य घरी होण्याची दाट शक्यता आहे.