Surabhi Jayashree Jagdish
घराचे व्यवहार करत असाल तर आज जपून करावेत. गणेश उपासना विशेष फलदायी ठरणार आहे. लांबचे प्रवास घडतील.
आयुष्यामध्ये मजा करण्यासाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकता. आज मात्र या आपल्या स्वभावाला आवर घालण्याची गरज आहे.
व्यावसायिक जोडीदार घरातील जोडीदार भावंडांचा आपल्याला चांगलाच पाठिंबा राहणार आहे. कोर्टाच्या कामांमध्ये यश मिळेल.
अति भावनिकता आणि साधेपणा कधी कधी अडचणीचे ठरतो. विनाकारण ताणतणाव वाढतील. काळजी घ्या.
रवी उपासना विशेष फलदायी ठरेल. धन योगाला दिवस उत्तम आहे.
सर्वांना जोडून ठेवण्याचे आज काम आपल्याकडून होईल. बौद्धिक गोष्टींमध्ये अग्रेसर राहाल. जागेचे व्यवहार होतील.
एक वेगळी जिद्द आणि उमेदीने भरलेला दिवस असेल. भावंडांना आपल्याविषयी अभिमान वाटेल.
जबाबदारीने घरातील कामे तुम्हाला आज पार पाडावी लागतील. महत्त्वाचे व्यवहार किंवा निर्णय आज होतील.
देवाने दिले आहे त्यामध्ये आनंद मानाल. निर्णय घेण्यात आज गडबड करू नका.
जुन्या गोष्टी उकरून काढून विशेष काही फरक होणार नाही. आलेल्या परिस्थितीशी आज दोन हात करा आणि आपले मनोबल सांभाळा.
प्रेमामध्ये यश मिळेल जवळच्या लोकांच्याकडून शाबासकीची पाठीवर थाप पडेल. दिवस आनंदी आहे.
कर्माला प्राधान्य देणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. तुमची कामगिरी प्रगतीच्या दिशेने होणार आहे.