Surabhi Jayashree Jagdish
घराची निगडित व्यवहार काही असतील तर असते आज ते पूर्ण होतील.
जवळचे प्रवास होतील. प्रेमामध्ये लाभ होतील. शेजारी आणि भावंडांपासून विशेष सहकार्य लाभेल.
सुख आले दारी असा दिवस आहे. धनाची आवक उत्तम राहील. कुटुंबीयांमध्ये खेळीमेळीचे वातावरणाने मन भरलेले राहील.
सहज, सोप्या गोष्टी आज दिवस भरात घडतील. आपला प्रभाव इतरांवर राहील. दिवस आनंदी आहे.
वीनाकरण वाद, कटकटी आपल्या बाबतीत होतील. अफवा सुद्धा उठतील. राशीला आपल्या साहस आणि धाडस भरपूर आहे.
मैत्रीमध्ये समझोता होईल. परदेशी भाषा आणि परदेशी मित्रांमुळे विशेष फायदा संभवतो आहे.
कामासाठी प्रवासाचे योग आहेत. यशस्वीपण आहे. कामाचे नव्याने दालने निर्माण होतील. सहकाऱ्यांचे सहकार्य उत्तम लाभल्यामुळे एक वेगळा हुरूप आज असेल.
कुलस्वामिनी ची उपासना आज फलदायी ठरेल. प्रवासामधून सुवार्ता समजतील.
अचानक धनलाभची शक्यता आहे. काळा पैसा अधिक घेताना सरकारी गोष्टीत अडकू नये याची काळजी घ्या.
जोडीदाराबरोबर तडजोड करून पुढे जावं लागेल. कष्टाला आज पर्याय नाही हे लक्षात ठेवा.
गुप्त शत्रू वाढतील. नोकरीमध्ये मात्र नेटाने कामाला लागाल. हाडाची दुखणे डोके वर काढतील.
दत्तगुरूंची उपासना आज फलदायी ठरेल. अभ्यासात गती आणि प्रगती दिसते आहे.