Surabhi Jayashree Jagdish
अनेकदा आपण म्हणतो की, पहिल्याच नजरेत प्रेम झालं होतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही राशींची माहिती देणार आहोत, ज्यांना पहिल्या नजरेत प्रेम होतं. या राशींचे लोक आकर्षण आणि भावनांमध्ये पटकन गुंततात.
वृषभ रास वैदिक ज्योतिषानुसार शुक्र ग्रहाची आहे. शुक्र हा प्रेमाचा ग्रह असल्यामुळे या राशीचे जातक अत्यंत रोमँटिक स्वभावाचे असतात. त्यांचा स्वभाव प्रेमळ आणि आकर्षक असतो.
वृषभ राशीचे जातक पहिल्या नजरेतच मन देतात. मात्र हे लोक थोडे लाजाळू असल्यामुळे प्रेम व्यक्त करण्यात वेळ घेतात. तरीही त्यांच्या मनातलं प्रेम खोलवर असतं.
कन्या राशी वैदिक ज्योतिषानुसार अत्यंत भावुक मानली जाते. या राशीचे जातक प्रेमाच्या बाबतीत खूप संवेदनशील असतात. त्यांचा स्वभाव भावनांनी ओथंबलेला असतो.
हे लोक इतके भावुक असतात की त्यांच्या मनाला स्पर्श झाला तर ते पहिल्या नजरेतच प्रेमात पडतात. त्यांचं हृदय सहजपणे जुळतं. त्यामुळे त्यांचं प्रेम खरं आणि खोलवर असतं.
तूळ राशीही शुक्र ग्रहाची आहे. त्यामुळे या राशीचे जातक अत्यंत रोमँटिक असतात. त्यांना सौंदर्य आणि आकर्षणाची विशेष ओढ असते.
हे लोक गर्दीतही आपलं प्रेम शोधू शकतात. पहिल्या नजरेतच प्रेमात पडणं त्यांच्यासाठी सहज असतं. या व्यक्ती प्रेम व्यक्त करण्यात अजिबात वेळ लावत नाहीत.