Shreya Maskar
हिवाळा अनेकांचा आवडता ऋतू आहे. हिवाळ्यात थंडगार वातावरणात फिरायला जाण्याची मजाच काही और असते. तुम्हीही वीकेंडला फिरण्याचा प्लान करा. पेन हे ठिकाण फिरण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे.
रायगड जिल्ह्यातील पेन परिसर निसर्गरम्य डोंगर, धबधबे, तलाव आणि हिरव्यागार परिसरासाठी ओळखला जातो. थंडीची चाहुल लागताच विकेंडला कुटुंबीय, मित्रमंडळींसोबत मुंबईजवळ पेनला पिकनिक प्लान करा.
पेन तालुक्यातील कासमळ परिसर निसर्गप्रेमींसाठी एक सुंदर ठिकाण आहे. येथील डोंगररांगा, हिरवळ आणि विस्तीर्ण निसर्गदृश्य पर्यटकांना आकर्षित करतात. फोटोग्राफी आणि शांत वातावरणाचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
डोंगरांच्या कुशीतून वाहणारे पाणी आणि आजूबाजूची हिरवळ मन प्रसन्न करते. मित्रांसोबत छोट्या सहलीसाठी हे ठिकाण आकर्षक आहे.
पेन तालुक्यातील आढर्णे परिसरात सातरी धबधबा आहे. पावसाळ्यात येथे पाण्याचा प्रवाह अधिक असतो. वन डे पिकनिकसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
पेन शहरातील मोती तलाव म्हणजेच मोतीराम तलाव हा निवांत वेळ घालवण्यासाठी चांगला आहे. तलावाच्या परिसरात फेरफटका मारता येतो आणि शांत वातावरणाचा आनंद घेता येतो. लहान मुलांसह किंवा कुटुंबासोबत संध्याकाळी फिरण्यासाठी हे ठिकाण विचारात घेता येईल.
भोगावती रिव्हर व्ह्यू पिकनिक स्पॉट धावते गावाजवळ आहे. नदीचे दृश्य, मोकळा परिसर आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे येथे पिकनिकचा आनंद घेता येतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.