Shreya Maskar
महाराष्ट्राला अत्यंत समृद्ध, गौरवशाली आणि प्रेरणादायी इतिहास लाभला आहे. हा इतिहास शौर्य, अध्यात्म, समाजसुधारणा आणि सांस्कृतिक वैभवाने नटलेला आहे. सुट्ट्यांमध्ये महाराष्ट्रातील लेणी पाहायला नक्की जा.
मुंबई-गोवा महामार्गाजवळील गांधारपाले लेणी डोंगरात कोरलेल्या प्राचीन बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. येथे दगडात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या पाहता येतात.
पुणे जिल्ह्यात कामशेतजवळ बेडसे लेणी आहेत. दगडी स्तंभ आणि प्रवेशद्वारावरील सुंदर कोरीव नक्षीकाम पाहायला मिळेल.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पितळखोरा लेणी आहेत. प्राचीन बौद्ध लेण्यांच्या महत्त्वाच्या समूहांपैकी एक आहे. येथील काही लेणी इ.स.पूर्व तिसऱ्या शतकाच्या आसपासची मानली जातात.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ लेणी आहेत. वेरूळ येथे एकूण ३४ लेणी असून, अजिंठा येथे सुमारे ३० बौद्ध लेणी आहेत.
मुंबईपासून समुद्रमार्गे जाता येणारी एलिफंटा लेणी घारापुरी बेटावर आहेत. समुद्रप्रवास, प्राचीन वास्तुकला आणि ऐतिहासिक वारसा यांचा अनुभव घेण्यासाठी हे उत्तम पर्यटनस्थळ आहे.
ऑक्टोबर ते फेब्रुवारीमध्ये ही लेणी पाहायला नक्की जा. येथील वास्तुकला, स्थापत्यकला, प्राचीन शिल्पे मुलांना नक्की दाखवा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.