Peda Recipe: घरच्या घरी बनवा बाजारासारखे दाणेदार मऊसूत पेढे; जाणून घ्या सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

आवश्यक साहित्य तयार करा

पेढे बनवण्यासाठी २५० ग्रॅम मावा किंवा खवा, अर्धा कप साखर, दोन चमचे तूप, अर्धा चमचा वेलची पूड आणि सजावटीसाठी बदाम-पिस्त्याचे काप घ्या.

Kesar Peda Recipe | yandex

कढईमध्ये खवा भाजून घ्या

सर्वप्रथम एका कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करा. त्यामध्ये खवा घालून मंद आचेवर सतत ढवळत भाजून घ्या. खव्याचा रंग थोडासा बदलू लागला की गॅस बंद करा.

Malai Peda Recipe | Saam TV

खवा थंड होऊ द्या

भाजलेला खवा एका ताटात काढून थोडा थंड होऊ द्या. खवा पूर्ण गरम असताना त्यामध्ये साखर घालू नका. त्यामुळे पेढ्यांचे मिश्रण पातळ होऊ शकते.

Peda | pinterest

साखर आणि वेलची पूड घाला

खवा कोमट झाल्यानंतर त्यामध्ये साखर आणि वेलची पूड घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. साखर विरघळल्यानंतर मिश्रण थोडे मऊ होईल.

Khava Peda | Google

मिश्रण घट्ट करून घ्या

आता हे मिश्रण पुन्हा मंद आचेवर ठेवा. सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होऊन कढईच्या कडा सोडू लागले की गॅस बंद करा. त्यानंतर मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

Peda Recipe:

पेढ्यांना आकार द्या

मिश्रण थंड झाल्यानंतर हाताला थोडे तूप लावा. त्याचे छोटे गोळे तयार करा आणि हलक्या हाताने दाबून पेढ्यांचा आकार द्या. प्रत्येक पेढ्याच्या मध्यभागी अंगठ्याने हलकी खूण करा.

Khava Peda | Google

बदाम-पिस्त्यांनी सजवा

शेवटी तयार पेढ्यांवर बदाम आणि पिस्त्याचे काप लावा. तुम्ही त्यावर थोडे केशरही घालू शकता. अशा प्रकारे घरच्या घरी मऊ, दाणेदार आणि स्वादिष्ट पेढे तयार होतील. हे पेढे देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आणि कुटुंबासोबत त्यांचा आनंद घेऊ शकता.

Peda Recipe:

Dewy Glass Skin Makeup: दिवाळीला चेहऱ्यावर शायनी नॅचरल ग्लो पाहिजे? मग तयारी करताना करा हा ड्यूई ग्लास स्किन मेकअप

Dewy Glass Skin Makeup | Saam Tv
येथे क्लिक करा