Shreya Maskar
बाजरीची खिचडी बनवण्यासाठी बाजरी, मुगाची डाळ, लसूण , आल्याचा तुकडा, हिरवी मिरची, शेंगदाणे इत्यादी साहित्य लागते.
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता, तिखट, मीठ आणि मिरची इत्यादी साहित्य लागते.
बाजरीची खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम बाजरी धुवून मिक्सरला पेस्ट करून घ्या.
आता गॅसवर कुकरमध्ये तेल, मोहरी, हिंग, लसूण, मिरच्या, आल्याची पेस्ट, कढीपत्ता टाकून फोडणी द्या.
आता या मिश्रणात बाजरीची पेस्ट आणि मुगाची डाळ पाणी टाकून कुकर लावा.
या मिश्रणात मीठ घालून ३-४ कुकरला शिट्ट्या करून घ्या.
दुसरीकडे एका पॅनमध्ये तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, लाल मिरच्या टाकून फोडणी करून घ्यावी.
आता ही फोडणी बाजरीच्या फोडणीवर टाका.