Shreya Maskar
पेरू कँडी बनवण्यासाठी पेरू, साखर, तूप, आयसिंग शुगर, पिठीसाखर इत्यादी साहित्य लागते.
पेरूकँडी बनवण्यासाठी सर्वप्रथम जास्त पिकलेले पेरु स्वच्छ धुवून त्यांचे तुकडे करुन घ्या.
पेरूचे तुकडे कुकरमध्ये वाफवून घ्यावे.
थंड झालेले पेरूचे तुकडे मिक्सरला प्युरी करून घ्या.
आता पॅनमध्ये पेरू प्युरी आणि साखर एकत्रित शिजवून घ्या.
शेवटी या मिश्रणात तूप घालून एकजीव करा.
काचेच्या डिशमध्ये मिश्रण ओतून चमच्याने पसरवून सेट होण्यासाठी ठेवा.
थोड्यावेळाने मिश्रण सेट झाल्यावर आवडत्या आकाराच्या वड्या पाडून घ्या.
शेवटी एका बाऊलमध्ये आयसिंग शुगर घेऊन त्यात पेरूच्या कँडीज घोळवून घ्या.